Nashik News: राजस्थानमधून ८५ उंट कत्तलसाठी; पथकाकडून सुटका, दोन उंटाचा मृत्यू

राजस्थानमधून ८५ उंट कत्तलसाठी; पथकाकडून उंटांची सुटका, दोन उंटाचा मृत्यू
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : राजस्थानमधून हैद्राबाद येथे कत्तलीसाठी पायी निघालेल्या तब्बल ८५ उंटांची सुटका करण्यात आली. गुरुवारी (Nashik) ॲनिमल वेल्फेअरच्या पथकाने या उंटांची सुटका करुन सर्व ८५ उंटांना चुंचाळे येथील पांजरपोळ येथे सोडण्यात आले. विशेष म्हणजे (Dhule) धुळे, ग्रामीण पोलिस (Police) आणि शहर पोलिसांकडून एवढ्या संख्येने उंट पायी जात असतांना वाहतूकदारांची साधी चौकशी देखील करण्यात आली नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. (Latest Marathi News)

Nashik News
Beed News: नवरा नपुंसक... सासरच्या मंडळींवर युवतीचा आराेप; प्राध्यापकासह सात जणांंवर गुन्हा

ॲनिमल वेल्फेअरचे पुरुषोत्तम आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथून तब्बल ८७ उंट हैद्राबाद येथे कत्तलीकरीता पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली. आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह धुळे, पिंपळनेर, साक्री, सटाणा, चांदवड, वणी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता उंट वाहतूक करणाऱ्यांची साधी चौकशी देखील केली नाही. उंट शहर पोलिस आयुक्तालयाच्या आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे आल्यानंतर आव्हाड यांनी पोलिसांना कळवले. मात्र पोलिसांनी तपोवनात एवढ्या संख्येने उंट राहिल्यास परिसरात अस्वच्छता निर्माण होईल; याचे कारण देत उंटांना तपोवनातून पुढे काढून दिले. भद्रकाली पोलिसांनी देखील कारवाई केली नाही.

Nashik News
Nandurbar Accident News : जळगावच्या दिशेने जाणा-या Car चा बर्डीपाडा टोलनाक्यावर अपघात; महिला ठार, आठ जखमी

दोन उंटांचा मृत्‍यू

अखेर आव्हाड यांनी पशुवैद्यकीय पथकासह सर्व उंटांची तपासणी केली असता यातील दोन उंटांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले. उर्वरीत ८५ उंटांची तपासणी केल्यानंतर सर्व उंटांची प्रकृती चांगली असल्याचे निदान करण्यात आले. या उंटांची वेल्फेअरच्या पदाधिकाऱ्यांनी सुटका करत पांजरपोळ येथे संगोपनासाठी नेले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com