Malegaon News : मंत्री दादा भुसेंच्या मुलाच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न; पहाटे चार वाजेची घटना

Nashik Malegaon News : दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे येत होते दोन वाहन आणि अविष्कार भुसे यांच्या वाहनांचा अपघात
Malegaon News
Malegaon NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
मनमाड (नाशिक)
: राज्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हे आपल्या दोन मित्रांसोबत घरी परत येत असताना त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीने धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून अपघातानंतर दुसऱ्या गाडीतील व्यक्तींनी अविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत मालेगाव- सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे परत येत होते. यावेळी टेहेरे चौफुलीजवळ मागून संशयित गो तस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येत त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तसेच त्यांच्या गाडीला डीव्हायडरकडे दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोणेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला.

Malegaon News
Dharangaon Accident : मित्राच्या वाढदिवसाचा केक आणायला जाताना मृत्यूने गाठले; दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात

या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डीव्हायडरमध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. तर संशयित गो तस्कर यांच्या देखील गाड्या डीव्हायडरला ठोकल्या गेल्या. या अपघातामुळे त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येवून त्यांनी त्या संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. 

Malegaon News
Pali Ballaleshwar Ganpati : पालीच्या बल्‍लाळेश्‍वराचा प्रसादात मिळणार चिक्‍की; देवस्‍थान ट्रस्‍टचा निर्णय

गाडीत आढळले दोर, लाठ्या काठ्या 

दरम्यान नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली. यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढलून आले. हे गो तस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com