Nashik Road Repair : नाशिकचे रस्ते होणार गुळगुळीत; खड्डे बुजवण्यासाठी १०४ कोटी रुपये

Nashik Road Pothole repair : नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी १०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
Nashik Road Pothole repair
Nashik Road Pothole repairSAAM TV
Published On

Rs 104 Crore for Nashik Road Repairing : नाशिकचे रस्ते आता गुळगुळीत होणार आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर नाशिककरांना दिलासा मिळणार आहे. नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यासाठी १०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे.

नाशिकमधील सर्व रस्ते आता खड्डेमुक्त होणार आहेत. वाहनचालकांना नाशिकच्या गुळगुळीत रस्त्यांवरून सुखाने प्रवास करता येणार आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे. खड्डे बुजवण्यासाठी १०४ कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

Nashik Road Pothole repair
Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

दोन-अडीच महिन्यांनंतर रस्ते दुरुस्तीला मुहूर्त

नाशिकमधील रस्त्यांच्या (Nashik Road) दुरुस्तीला दोन-अडीच महिन्यांनंतर अखेर मुहूर्त सापडला आहे. १०४ कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. पावसानं उघडीप दिल्यानंतर पुढील १५ दिवसांत रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती (Road Repair) करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

Nashik Road Pothole repair
Aaditya thackeray Tweet: ...तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार नाही; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

पालकमंत्र्यांनी दिला होता अल्टिमेटम

मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेत मे मध्येच तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी खड्डे दुरुस्तीसाठी निविदा मंजूर करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर जवळपास दोन महिने प्रशासकपदाच्या खुर्चीचा खेळ सुरू राहिला. त्यानंतर करंजकर यांची नियमित नियुक्ती झाली खरी, मात्र तरीही प्रस्ताव मंजुरीला आला नाही.

अखेरीस खड्ड्यांवरून पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट रस्त्यावर उतरत महापालिकेला पंधरा दिवसांत खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर १०४ कोटी ३३ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com