नाशिकमधील शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित
मुंबईच्या वेशीवरून मोर्चा माघारी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा
शेतकऱ्यांना तीन महिन्यांची मुदत
फैय्याज शेख, शहापूर
राज्यात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाँग मार्च काढण्यात आला होता. या लाँग मार्चला स्थगिती मिळाली असून शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या वेशीवरून परत माघारी गेले आहे. तीन महिन्याची मुदत मागण्यात आली असून या मुदतीत किसान सभेच्या समीती सोबत अनेक बैठकी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, आदि मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढलेल्या लाँग मार्चच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा या निवासस्थानी मंगळवारी सकारात्मक चर्चा झाली होती.
हा मोर्चा काल मुंबईच्या सीमेवर भातसा नगर फाटा येऊन धडकला होता. हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते असून मुंबई मोर्चा आला तर मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून व शासन स्तरावर विविध खात्याच्या मंत्री यांच्या बैठकीतील चर्चेअंती मार्ग निघाला आहे.
या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष केकान, ठाणे पोलीस अधीक्षक डी. एस.स्वामी, मंत्री गिरीश महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, डॉ.दिगपाल गिरासे यांनी आज आंदोलक शेतकऱ्यांची भातसा फाटा येथे भेट घेऊन शासनाची भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. शासनाने घेतलेले निर्णय याविषयी माहिती करून दिली. हजारो आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या गावी परतण्याची सोय मंत्री महाजन यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले. शिवाय तीन महिन्याची मुदत मागण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.