Nashik Guardian Minister: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून नवा ट्विस्ट? शिवसेना नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Nashik Guardian Minister: शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावून मोठं विधान केलंय.
Nashik Guardian Minister: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून नवा ट्विस्ट?  शिवसेना नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ
Published On

पालकमंत्रिपदाची नावे जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील तिढा सुटल्याचं वाटत होतं. परंतु नावांची यादी जाहीर होताच महायुतीमध्ये अजून वाद सुरू झालाय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सरकारमध्ये वाद सुरू झालाय. त्यानंतर सरकारने दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलीय. त्याचदरम्यान शिवसेनेचे उपनेते जिल्ह्या प्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून मोठं विधान केलंय.

लवकरच नाशिकसाठी गोड बातमी ऐकायला मिळेल. पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे लवकर योग्य ते निर्णय घेतील. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दादाजी भुसे यांच्याकडे देण्यात येईल असं विधान केलंय. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. सरकारकडून शनिवारी जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यावरून वाद निर्माण झालाय.

त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी पालकमंत्रिपदाबाबत मोठं विधान केले आहे. पक्ष नेते एकनाथ शिंदे लवकरच योग्य निर्णय घेतील. त्याचबरोबर नाशिककरांना आनंदाची बातमी मिळेल. नाशिकचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी दादाजी भुसे यांच्याकडे दिली जाईल असं बोरस्ते हे म्हणालेत.

पालकमंत्रिपदाला स्थगिती

रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता.

त्याचबरोबर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. त्यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली.

नाशिकमध्ये वाद का?

नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने आपल्याकडे घेऊन त्या पदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलीय. त्यातून त्यांनी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री न घेण्याचे ठरवले होते असे समजते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक ७ आमदार आहेत. तर भाजपचे पाच आमदार आहेत. पण राष्ट्रवादीच्या नाशिक जिल्ह्यातील मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com