Nashik graduate constituency : शुभांगी पाटील यांच्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; नाशिक जिंकण्यासाठी मुंबईतून रसद

ठाकरे गटाने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.
Nashik Graduation Election
Nashik Graduation ElectionSaamtv

निवृत्ती बाबर

Nashik graduate constituency News : नाशिक पदवीधर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात सत्यजीत तांबे जोर लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. (Latest Marathi News)

Nashik Graduation Election
Satyajeet Tambe: सत्यजित तांबेंची खदखद बाहेर; खूप राजकारण झालं, वेळ आल्यावर...

सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपला फायदा होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे.

ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून (Uddahv Tackeray Group) नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मुंबईतून रसद पुरवण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या वतीनं शंभरहून अधिक पदाधिका-यांची कुमक प्रचारासाठी पाठवली जाणार आहे.

ठाकरे गटाची मोठी रणनीती

नाशिक (Nashik) पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी ठाकरे गटाचे मुंबईतील २५ नगरसेवकांसह १०० पदाधिकारी नाशिक पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार आहे. शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती आखली आहे.

यासाठी २३ तारखेची षण्मुखानंद येथील सभा संपल्यानंतर २४ तारखेपासून संबंधित पदाधिकारी नाशिककडे रवाना होणार होणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विभाग वाटून दिले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने प्रचार करणार आहे.

शुभांगी पाटील यांची सत्यजीत तांबेवर टीका

दरम्यान, ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. कालच शुभांगी पाटील याकाँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी पोहचल्या. मात्र, बाळासाहेब हे उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात असल्याने भेट झाली नाही. त्यावेळी शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांचा खरपूस समाचार घेतला.

'सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांचा एबी फॉर्म कोरा होता. ते आता कुठ जातील हा त्यांचा विषय आहे. जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होतील, अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com