Nashik News : वीज दुरुस्तीचं काम करताना शॉक लागला, २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Nashik News : सकाळी विद्युत लाईनच्या पोलवर दुरुस्तीचे काम करीत असतांना या जाईच्या जवळून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने विद्युत लाईनचे काम सुरु होते. हे काम करीत असतांना बाजूने गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसल्याने दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना चांदवड तालुक्यातील विटावे या गावात सकाळच्या सुमारास घडली.  

Nashik News
Ahmednagar News : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी होणार चौकशी; त्रिस्तरीय समितीची नेमणूक

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड तालूक्यामधील विटावे या गावात घडलेल्या घटनेत सुनिल खुमा वळवी व केवळ सोत्या पाडवी या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही नंदूरबार जिल्ह्यातील असून ते विद्युत ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. दरम्यान सकाळी विद्युत लाईनच्या पोलवर दुरुस्तीचे काम करीत असतांना या जाईच्या जवळून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसला. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.  

Nashik News
Jalgaon Accident : श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

दरम्यान घटना घडल्यानंतर सोबत काम करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चांदवड पोलिसात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com