सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान, एसटी बसला आग लागल्याची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज (शनिवार) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत डेपोची प्रवाशांना घेऊन श्री सप्तशृंगी गडाकडे निघाली होती. बस ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ आली असता, अचानक बसला आग लागली. बसला आग लागल्याची कळताच, चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले.
आगीची माहिती मिळताच, स्थानिकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली.सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत.
भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिका तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.