Nashik Breaking News : नाशकात दारू पिऊन महिलेचा धिंगाणा; पोलिसांनाही आवरेना, पाहा VIDEO

एका महिलेनं चक्क दारू पिऊन बसमध्येच धिंगाणा घातला
Nashik Drunk Woman Viral Video
Nashik Drunk Woman Viral VideoSaam TV
Published On

तबरेज शेख, साम टिव्ही

Nashik Drunk Woman Viral Video : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेनं चक्क दारू पिऊन बसमध्येच धिंगाणा घातला. ही महिला दारूच्या नशेत इतकी तर्राट झाली होती की, तिने बसमधील वाहक आणि प्रवाशांना शिवीगाळ केली. या सर्व प्रकारानंतर बस चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ (Viral Video) बसमधील व्यक्तींनी शूट केला असून तो सध्या समोर आला आहे. (Nashik Drunk Woman News)

Nashik Drunk Woman Viral Video
Snake Attack : चिमुकल्याचा धक्का लागताच नागाने काढला फणा; पुढे काय झालं? पाहा VIDEO

दारू पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा

प्राप्त माहितीनुसार, घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका महिलेने दारू पिऊन धिंगाणा घातला. नशेत टुल्ल असलेल्या या महिलेनं बसमधील प्रवाशांना तसेच चालकांना चांगलाच त्रास दिला. शेवटी महिलेच्या या कृत्याला कंटाळून बस चालकाने धिंगाणा घालणाऱ्या महिलेला पोलिसांच्या हवाली केलं. (Nashik ST Bus Drunk Woman News)

नाशिकमध्ये दारू पिऊन महिलेचा धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

दरम्यान, पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही ही महिला शांत झाली नाही. समोर पोलिसांना पाहूनही तिची नशा उतरली नाही. आणि तिने पोलिसांनाही अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर महिलेची झिंग उतरल्यावर पोलिसांनी तिला समज देऊन सोडून दिले. याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण बसमधील प्रवाशांसह पोलिसांना मद्यपी महिलेचा नाहक त्रास सहन करावा लागला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com