Nashik Accident: अर्ध्यावर संसार मोडला, बाजारात जाताना काळाचा घाला, नवऱ्यासमोरच पत्नीचा अपघाती मृत्यू

Nashik Bike And Eicher Accident: शहरात दोन दिवसात दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात दोन जणांना आपला जीव गमावावा लागलाय. त्रिंबक रोडवर झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झालाय.
ट्रॅव्हलच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू
Nashik Bike And Eicher Accident:Saam Tv
Published On

तरबेझ शेख, साम प्रतिनिधी

नाशिकच्या सातपूर परिसरात आणखी एक मोठा अपघात घडला आहे. त्रिंबक रोडवर आयशर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरात दोन दिवसात दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही अपघातात जीवितहानी झालीय.आयशर गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झालाय. सुनिता जाधव (४० वय ) असं अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता जाधव ह्या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. ते त्रिंबक रोडवर आले असताना एका आयशर गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुनिता जाधव यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सातपूर पोलीस दाखल झाले असून ते या घटनेचा तपास करत आहेत. त्रिंबक रोडवर दोन दिवसात दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात दोन जणांचा मृत्यू झालाय.

ट्रॅव्हलच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू
Pune Dumper Accident: भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं; डंपरखाली येत दोन तरुणींचा मृत्यू

शुक्रवारी अपघाताची घटना घडली होती. यात महाविद्यालयन तरुणाचा बसच्या धडकेत झाला मुत्यू झाला होता. आयशर आणि दुचाकीच्या अपघात झाल्यानंतर सुनीता जाधव ह्या आयशरच्या चाकाखाली आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सातपूर परिसरातील महिंद्रा सर्कल या ठिकाणी घडला. सुनीता आपल्या पतीसोबत बाजारात दुचाकीवर जात होते. त्यावेळी अपघात घडला आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सिग्नल यंत्रांना बसवली आहे.

ट्रॅव्हलच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रेलरने ५० वाहनांना उडवलं, VIDEO

मात्र मध्यभागी सर्कल असल्याने ही सिग्नल यंत्रणा चुकीची असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. अनेक वाहनधारक या सिग्नलचे नियम सर्रासपणे तोडतात त्यामुळे येथे नेहमी अपघात घडत आहेत. औद्योगिक परिसर असल्याने संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग बाहेर पडतो. मात्र येथे एकही ट्रॅफिक पोलीस नसल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकूणच दोन दिवसांत त्रिंबक रोडवर दुसरा अपघात झाल्याने दोन दिवसात दोन लोकांचा मुत्यू झालाय.

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

शहरातील पंचवटी भागातील मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील एका अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. प्रमोद महाजन उद्यानाजवळ हा अपघात झाला असून यात महिला ट्रक खाली येत चिरडली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com