Nashik Accident News: नाशकात तीन वाहनांचा भीषण अपघात; तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

यामध्ये बस, पिकअप आणि ट्रॅक्टर अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली.
Nashik Accident
Nashik AccidentSaam TV

Nashik News: नाशिकमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. तीन वाहनांची एकमेकांना जोरात धडक बसली आहे. यामध्ये बस, पिकअप आणि ट्रॅक्टर अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा-देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास सावकी फाटा येथे बस,ट्रॅक्टर व पीकअप यांचा तिहेरी अपघात (Accident) होऊन यात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस मधिल प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील १० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झालेत.

Nashik Accident
Gondia Car Accident: गोंदियामध्ये भीषण अपघात, कारचा झाला चक्काचूर; एकाचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

नाशिकहून नंदुरबारकडे भरधाव जाणा-या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टर पुढे जाणा-या पिकअपवर जाऊन धडकला.अपघाताची माहिती समजताच जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.

द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार!

वाशीमच्या जाग माथा परिसरात आज पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नागपूरवरून नांदेडकडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा या मध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते.

Nashik Accident
Pune Accident News: टेम्पोचा भीषण अपघात; भरधाव वेगात वाहन थेट हवेत फेकले गेले अन्...

दरम्यान आग (Fire) लागल्याचा प्रकार एका प्रवाश्याच्या लक्षात येताच चालकाला तत्काळ माहिती देताच सर्व प्रवासी खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमध्ये बस (Bus) जळून राख झाली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मात्र प्रवाश्याच्या साहित्याचा कोळसा झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com