CCTV Footage: मद्यपी डंपर चालकाने ३ ते ४ दुचाकींना उडवलं; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nashik Accident News: वाहनांना धडक देत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनासह पलायन करत होता. मात्र त्या मद्यपी डंपर चालकाला व त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतलं आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV
Published On

Nashik News:

नाशिकच्या पंचवटी परिसरात भीषण अपघाताची घडना घडली आहे. काळाराम मंदिर, सरदार चौक गंगाघाट ते मनपा विभागीय कार्यालयादरम्यान रस्त्यावर हा अपघात झाला आहे. मद्यपान करून डंपर चालक वाहन चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

CCTV Footage
Nahsik GramPanchayat News | नाशिकमधील 48 पैकी 13 ग्रामपंचायतींचे निकाल

काल मध्यरात्री ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमध्ये मद्यपी डंपर चालक हा एकापाठोपाठ एका वाहनांना धडक देत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनासह पलायन करताना दिसतोय. मात्र त्या मद्यपी डंपर चालकाला व त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतलं आहे.

मखमलाबाद नाक्यावर असलेल्या पंचवटी मनपा विभागीय कार्यालयासमोरून वाहन चालकाला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. मद्यपी डंपर चालकाने केलेल्या अपघातात चार ते पाच नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. तर पाच ते सहा दुचाकी वाहन आणि दोन-तीन मनपा पथदीपांचे नुकसान झाले आहे.

व्हिडीओमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की, डंपर समोरून येणाऱ्या एका दुचाकीला आधी धडकला. तसेच मागे देखीव काही दुचाकींना धडक दिली आहे. अपघाताचा हा थरारक रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नागपूरमध्ये महिला मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात

नागपूरमध्ये देखील अपघाताची अशीच एक भीषण घटना घडली आहे. येथील भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात झालाय. कामगार महिला कामानिमित्त बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. यात तीन जणांचा मृत्यू झालाय.

CCTV Footage
Dhule Crime : घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे ताब्यात; ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com