Narendra Modi Swearing : नरेंद्र मोदींचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही; बुलढाण्यातील ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याआधीच बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
नरेंद्र मोदींचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही; बुलढाण्यातील ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Buldhana Dattatraya Deshpande Maharaj BhavishyavaniSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सायंकाळी ७ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याआधीच बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

नरेंद्र मोदींचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही; बुलढाण्यातील ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Politics News : मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबड्या घेऊनच राष्ट्रपती भवनात जावे लागेल; 'सामना'तून टोला

नरेंद्र मोदी यांचं सरकार ६ महिनेही टिकू शकणार नाही, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा धुव्वा उडेल. महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागेवर उमेदवार निवडून येतील. अजित पवार यांच्या पक्षाचं नामोनिशाण राहणार नाही, असंही दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या काळात अनेकजण भविष्यवाणी करतात. यातील काही अंदाज चुकीचे तर काहींचे अंदाज खरे ठरतात. आदिशक्तीचे साधक तथा बुलढाणा येथील प्रसिद्ध ज्योतिष्यकार दत्तात्रय देशपांडे महाराज यांनी काही २८ मे रोजी मोठी भविष्यवाणी केली होती. लोकसभा निवडणूक निकालात भाजपले २३५ ते २४० आणि काँग्रेसला २५५ पर्यंत जागा मिळणार असे ते म्हणाले होते.

तसेच नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेसाठी तडजोड करावीच लागेल, असं भाकीतही देशपांडे महाराज यांनी केलं होते. त्यांचा हा अंदाज काही प्रमाणात खरा ठरला. आता लोकसभा निकालानंतर त्यांनी पुन्हा नवीन भविष्यवाणी केली आहे. नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार ६ महिन्यांच्यावर टिकू शकणार नाही, असं भाकित देशपांडे महाराज यांनी केलं आहे.

भाजपने सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला संधी द्यायला हवी होती, असं मतही देशपांडे यांनी व्यक्त केलंय. इतकचं नाही तर, येणाऱ्या विधानसभेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या हातून सत्ता जाईल. तसेच अजित पवार यांच्या पक्षाचा दारुण पराभव होईल. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत बोलबाला राहील. अशी भविष्यवाणी देशपांडे महाराज यांनी केली.

नरेंद्र मोदींचं सरकार ६ महिनेही टिकणार नाही; बुलढाण्यातील ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
PM Modi Oath : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार; पंडित नेहरू यांच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी करणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com