नाशिक : नाशिक पोलीसात (Nasik police) केंद्रिय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांच्या आदेशावरुन नाशिक पोलीसाचं एक पथक राणेंना अटक करण्यासाठी रत्नागिरीकडे रवानाही झालं. मात्र दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलीस आयुक्तांच्या कारवाईवर आक्षेप घेतल्यानंतर आज त्यांनी आज आपली भुमिका स्पष्ट केली.
हे देखील पहा-
यावेळी बोलताना आयुक्त दिपक पांडे म्हणाले की, 'नारायण राणेंना अटक करण्यासाठी काढलेले आदेश योग्य आणि कायदेशीर होते. नाशिक पोलीसांच पथक रत्नागिरीत पोहचलही होत. मात्र घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ,अस राणेंनी लिहून दिल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्याची गरज नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये हाच या कारवाई मागे हेतू होता.' इतकेच नव्हे तर, ' २ सप्टेंबरला नाशिक पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदविण्यास सांगितले आहे,' असेही यावेळी नाशिक पोलीस आयुक्तांनी नमुद केले.
केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वादाची ठिगणी पडल्यानंतर काल राज्यभरात निदर्शने, आंदोलने झाली. नारायण राणेंची अटक आणि जामीन या सर्व घडामोडींनी काल दिवसभर राज्याचं राजकारण ढवळून निघाल होतं. राणेंना अटक करण्यासाठी एकीकडे नाशिक पोलीस तर दुसरीकडे पुणे पोलीसांच एक पथक रत्नागिरीकडे रवानाही झालं पण राणेंना रत्नागिरी पोलीसांनी अटक केली.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.