Nandurbar ZP News : नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता परिवर्तन चर्चेला विराम; निवडणुकीतच बहुमताने सत्ता आणण्याचा पाडवींचा दावा

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण जिल्हाभरात आता जिल्हा परिषदेवर सत्ता परिवर्तन होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती
Nandurbar ZP
Nandurbar ZPSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता परिवर्तन होण्याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांना काँग्रेसचे माजी आमदार के. सी. पाडवी यांनी पूर्ण विराम लावला असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच बहुमताने सत्ता स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

Nandurbar ZP
Beed Police Bharti : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण जिल्हाभरात आता (Nandurbar ZP) जिल्हा परिषदेवर सत्ता परिवर्तन होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्हा परिषदेवर सध्या भाजपची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपने सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्यांच्या समर्थनाने भाजपची (BJP) सत्ता स्थापित केली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समीकरण बदलले आहेत. यामुळे पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होणार अशी चर्चा सुरु होती. 

Nandurbar ZP
Sant Muktabai Palkhi : संत मुक्‍ताबाईची पालखी बुलडाण्यातील राजुर घाटात दाखल; बैलजोडीच्या साह्याने चढला राजुर घाट

चर्चा सुरू असताना (Nandurbar) जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार के. सी. पाडवी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे, जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. तसेच याचा फायदा विधानसभा निवडणुकीत देखील मिळणार. यासाठी आम्ही सत्ता परिवर्तन न करता जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका लागतील आणि आम्ही पूर्ण बहुमताने आमची सत्ता स्थापित करणार; असं विश्वास देखील आमदार के. सी. पाडवी यांनी व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com