नंदुरबारमध्ये पाऊस पडताच आदिवासी बांधवांनी केली निसर्गाची पूजा; जाणून घ्या काय आहे परंपरा

पावसाळा सुरू झाला की आदिवासी बांधवांमध्ये निलपी पूजा, वाघदेव व नागदेव पूजन करून निसर्गदेवताची पूजा करण्याची लगबग सुरू होते.
nandurbar news
nandurbar news saam tv
Published On

Nandurbar News In Marathi : पावसाळा सुरू झाला की आदिवासी बांधवांमध्ये निलपी पूजा, वाघदेव व नागदेव पूजन करून निसर्गदेवताची पूजा करण्याची लगबग सुरू होते. एकविसाव्या शतकातही आदिवासी बांधव हे वाघदेव म्हणजे निसर्गाची पूजा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात करतात. यंदाच्या वर्षीही आदिवासी (Tribal) बांधवांनी ही पूजा केली.

nandurbar news
पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्तांनी स्वतः बुजविले खड्डे
nandurbar news
पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्तांनी स्वतः बुजविले खड्डे

यावेळी बंधारे गावातील वाघदेव पुजारी धर्मा वसावे, सतिष वसावे, मोनू गावीत, दशरथ वसावे, ईशमान गावीत, राजेंद्र वसावे, तुकाराम वसावे, ईद्रसिंग वसावे, बकाराम वसावे, जतनसिंग वसावे, अशोक पाडवी, दासू वळवी, गिरजी गावीत, सामजी वसावे, युवक बंधारे सोमनाथ वसावे, ईश्वर वसावे, कूष्णा वसावे, दिनेश वसावे, अतुल पाडवी, विलास वसावे, विश्वास वसावे, राजू वसावे, भिकाजी वसावे, सुनिल गावीत, सुर्या वसावे, राहुल गावीत, प्रथ्वीराज वसावे आधी प्रमुख गावातील मंडळी सह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नदीवर पूल नसल्याने जीवघेणा प्रवास; ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे हाल

शहादा तालुक्यातील कोटबांधणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भाऊसिंगपाडा, चंद्रसिंगपाडा, गुराडपाडा, सिसापाडा, बामणकुंडपाडा येथील नागरिकांना रेशन, पोषण आहार, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत कोटबांधणी येथे जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना पालक आपल्या पाठीवर बसवून नदी पार करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील तालुक्यात पाडा शाळेवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येण्याआधीच पोलीस विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोखंडी पूल उभा करून विद्यार्थ्यांना सोय करून दिली आहे. याबाबत जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला होता. पोलीस विभाग काम करू शकते तर प्रशासनातले अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com