नंदुरबार : देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत - पालकमंत्री

नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावे. असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज दिले.
नंदुरबार : देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत - पालकमंत्री
नंदुरबार : देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत - पालकमंत्रीSaamTvNews
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावे. असे निर्देश राज्याचे आदिवासी (Aadivasi) विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी आज दिले.

नंदुरबार (Nandurbar) जिल्हाधिकारी कार्यालयात देहली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. देहली प्रकल्प (Dehali Project) हा जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील 3 हजार 165 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देहली प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही मागण्या व अडीअडचणी असतील त्या त्वरीत सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हे देखील पहा :

देहली प्रकल्पग्रस्तांच्या गावातील रस्ते बनविण्यासाठी तात्काळ सर्व्हेक्षण करण्यात यावे, जेणेकरुन त्यांना तात्काळ मंजूरी दिली जाईल. यंत्रणेने स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिर, घरकुल अशा मुलभूत सोईसुविधांचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे. या भागातील नागरिकांसाठी तात्पुरती पाणी पुरवठा योजना न राबविता भविष्यातील अनेक वर्षांचा विचार करून पाणीपुरवठा योजना तयार करण्याची सूचना देखील पाडवी यांनी यावेळी केल्या.

नंदुरबार : देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत - पालकमंत्री
Akola : पाणीपट्टी करवाढीविरोधात शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन

प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, ‘मी समृध्द गाव समृध्द’ योजनेतंर्गत शोषखड्डा, शेळी शेड, गुरांसाठी गोठा, कंबोज खत प्रकल्प असे विविध उपक्रम तसेच विविध योजनांचा लाभ देण्यात यावा. ज्या लोकांच्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत. ज्यांची घरे बुडीत क्षेत्रात जाणार आहे अशांना तात्पुरत्या स्वरुपात निवासासाठी शेडची उभारणी करावी अश्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनास केल्या आहेत.

नंदुरबार : देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत - पालकमंत्री
'सॅड साॅंग' ऐकून नांदेडमधील तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले..!

2010 च्या आधीपासून ज्या नागरिकांचे भूसंपादन प्रलंबित आहे. त्यांच्या सर्व्हेक्षणासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही पाडवी यांनी यावेळी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकसंघर्ष मोर्च्याचे कार्यकर्ते, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com