डाकिणीचा संशय असलेली 'ती' महिला सापडली; काय आहे सत्य ते पाहा!

डाकिणीचा संशय असलेली 'ती' महिला सापडली; काय आहे सत्य ते पाहा!
Nandurbar News Updates
Nandurbar News UpdatesSaam tv
Published On

नंदुरबार : डाकीण ठरवून महिलेला निर्वस्त्र करुन छळ होत असलेला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओतील महिला ही मनोरुग्ण असून सदर महिला महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील पानसेमल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बायगोर गावातली आहे. गावातील काही लोकांनी तिला डाकीण ठरवून अंगावर चटके देण्याची शिक्षा दिली होती. (nandurbar news viral video woman suspected of being a witch was found)

Nandurbar News Updates
एसटीची चाके रूळावर; जळगाव विभागात साडेतीन हजाराहून अधिक कर्मचारी रूजू

सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर महिला तीस वर्षाची विवाहित तरुणी असून गेली बारा वर्ष मनोरुग्ण अवस्थेत गावातच हिंडत आहे. (Nandurbar News) नग्नावस्थेत चटक्यांची शिक्षा देऊनही सदर प्रकरण गावातच जात पंचायतीने मिटवल्याचे सांगण्यात आले आहे. (Nandurbar News Updates)

बारा वर्षांपासून मनोरुग्ण

सदर गावाचा शोध लावून प्रत्यक्ष महिलेची भेट घेतली. महिला आणि तिचे कुटुंब अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत असून, म्हातारे आई– वडील व लहान भाऊ असा छोटा परिवार आहे. मजुरी करून जीवन जगणार्‍या या कुटुंबात सदर महिला बारा वर्षापासून मनोरुग्ण अवस्थेत आहे. अंधश्रद्धेच्या पायी कुटुंबाने सदर महिलेला अनेक बुवा- बाबा मांत्रिक यांच्याकडे फिरवत उपचार करण्याचा प्रयत्न केला. काही हजार रुपये खर्च करूनही उपचार न झाल्याने सदर महिला आजही मनोरुग्ण अवस्थेत आहे.

अंनिसचे कार्यकर्ते पोहचले

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन सदर कुटुंबाला आधार दिला आणि मानसिक उपचारासाठी मदतीची ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सदर तक्रार मध्यप्रदेश प्रशासनापर्यंत पोहोचून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत संघटना प्रयत्न करणार आहे. तेथील प्रशासनाच्या सहकार्याने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाचे मोहीम सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com