तोरणमाळचे दृश्य पर्यटकांना करतेय आकर्षित

तोरणमाळचे दृश्य पर्यटकांना करतेय आकर्षित
Toranmal
ToranmalToranmal
Published On

खेडदिगर (नंदुरबार) : महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेचे ठिकाण असलेले धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे वसंत ऋतूत पर्यटकांची मोठ्याप्रमानात ये जा असते या वसंत ऋतूत सर्वीकडे हिरवळ वातावरण झाल्याने पर्यटकांना आकर्षित करत आहे. पर्यटनाचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा अच्छे दिन येत असल्याचे दिसून येत आहे. (nandurbar-news-view-of-Toranmal-attracts-tourists)

तोरणमाळ हे थंड हवेचे निसर्ग सौंदर्य स्थळ असून त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होते यामुळे अशा अतिदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तोरणमाळ ग्रामपंचायत तसेच म्हसावद पोलिस ठाणे अंतर्गत संयुक्त बैठक बोलवून शनिवार, रविवार कडक लॉकडाउन तसेच आठवडे बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना तोरणमाळ पर्यटन स्थळावर येण्यास बंदी आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हळूहळू जनजीवन पूर्व पदावर येत असून घरात बसून राहिलेले पर्यटकांना थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ पर्यटनस्थळ ही पर्यटकांना आकर्षित करतेय.

Toranmal
घरकुलासाठी महापालिकेच्या प्रवेश द्वाराचे कुलूप फोडून मोर्चेकरांचा हल्लाबोल

वातावरणात हिरवळ

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु या पंधरा दिवसाच्या कालावधीत काही प्रमाणातच या ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने तोरणमाळ परिसरातील निसर्ग फुलला असून वातावरण हिरवळ निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. यात अधिक भर धुकेली वातावरण थंड सीत लहरी याने पर्यटकांना आकर्षित केले आहे.

पर्यटकांनी गर्दी न करण्याचा सूचना

या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने संबंधित पोलिस स्टेशनने पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे तरी हौशी पर्यावरण प्रेमी हे गेल्याशिवाय राहत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com