नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहादा शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. आता जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आसल्याने उपाय योजना करण्यासाठी बैठका झाल्या. मात्र प्रत्यक्ष उपाय योजना झाल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी शहादा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन ऑक्सिजन प्लांट आणि इतर बाबींचा आढावा घेतला. रुग्णालयाचे बाकी असलेले काम पूर्ण करून लवकरच कोवीड (Corona) रुग्णांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Nandurbar News Updates: Corona Situation Inspection by Collector Manisha khatri at Shahada City )
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी शहादा (Shahada) येथील ग्रामीण रुग्णालय आणि इतर ठिकाणी पाहणी केली. यामुळे यंत्रणेची चांगलीच दमछाक उडाली. नव्याने उभारण्यात येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधा सुरू करण्यासाठी तसेच शहादा शहरातील इतर समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी दिली.
फिल्टर प्लांटची पाहणी
पावसाळ्यात दरवर्षी शहादा शहरात पाणी शिरून जलमय परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा; यासाठी प्रशासनाच्यावतीने पाणी फिल्टर प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. या प्लांटबाबत शहादा शहरातून नागरिकांद्वारे लेखी व निवेदनाद्वारे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पाणी फिल्टर प्लांटची पाहणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.