नंदुरबार : दीड महिने उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांचा तिढा सुटला नसल्याने ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना (Student) अखेर खासगी वाहनाने जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले. त्यामुळे किती दिवस घरी बसावे असा विचार करून विद्यार्थी आता शाळा-महाविद्यालयांमध्ये येऊ लागले आहेत. सध्या प्रथम सत्राच्या परीक्षा (Exam) सुरू असल्याने विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांमध्ये येऊ लागले आहेत. (nandurbar news Student threatening journey on foot private taxi in st strike impact)
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या व शासनाच्या तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे कर्मचारी अद्याप संपावर (St Strike) ठाम असून शासन जोपर्यंत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी कामावर रुजू होणार नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. काम असल्यामुळे जादाचे भाडे देऊनही प्रवाशांना प्रवास करावाच लागत आहे. मात्र त्यात विद्यार्थीही सुटलेले नाहीत.
कोंबून भरल्यानंतरही विद्यार्थ्यांना टपावर जागा
ग्रामीण भागातील विद्यार्थी गेले दीड दोन महिन्यापासून शाळा सुरू झाल्यानंतरही घरीच होते. तर काही ऑनलाइन शिक्षण (Online Education) घेत होते. मात्र घरी थांबणार तरी किती दिवस आणि म्हणूनच गावातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन खासगी वाहनधारकांची बोलणी करून शाळा-महाविद्यालयांत ने आण करण्यासाठी भाडे ठरवून ये जा करू लागले आहेत. मात्र काही गावांमध्ये दहापेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने व वाहनधारक आलाही वाढत्या डिझेल-पेट्रोलच्या दरामुळे एकाच फेरीत जास्तीत जास्त विद्यार्थी ने आण करणे सोयीचे होत असल्याने एकाच वाहनात कोंबून भरल्यानंतरही काही विद्यार्थ्यांना अक्षरश: टपावर बसण्याची वेळ आली आहे.
अनेक गावांमधून विद्यार्थ्यांची ये–जा
नंदुरबार (Nandurbar) परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी व विद्यार्थिनी रोज शाळा-महाविद्यालयांमध्ये ये जा करू लागले आहेत. सध्या माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रथम सत्रची परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना यावेच लागत असल्याने खासगी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी विद्यार्थ्यांचीच दिसू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.