शहाद्यातून दारू बनविण्याचे विषारी स्पिरीट जप्‍त; साडे अकरा लाखाचा माल ताब्‍यात

शहाद्यातून दारू बनविण्याचे विषारी स्पिरीट जप्‍त; साडे अकरा लाखाचा माल ताब्‍यात
Wine spirit
Wine spirit

नंदुरबार : म्हसावद गावाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनास अडवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ लाख ५० हजार रूपयाचे विषारी स्पिरीटची अवैध वाहतुक करतांना पकडले. ही कारवाई लोणखेडा (ता. शहादा) चौफुलीजवळ केली. स्पिरीटसह वाहन जप्त करण्यात आले असून वाहनचालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nandurbar-news-shahada-Seizing-the-poisonous-spirit-of-making-wine-from-martyrdom)

जिल्ह्यातील अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले होते. ३० जुलैस धुळे येथुन नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावाकडे चारचाकी वाहनातुन दारू बनविण्याकामी उपयोगी येणारे स्‍पीरीटची वाहतुक होणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली. पोलीस निरीक्षक श्री. कळमकर यांनी पथकास तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

वाहनाचा पाठलाग करून पकडले

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ३० जुलैस शहादा शहरातील लोणखेडा येथील लाईफ केअर हॉस्पीटजजवळ सापळा रचला. सायंकाळी साडेसहाचा सुमारास म्हसावद गावाच्या दिशेला वाहन (क्र. MH ४३, AD २५६०) भरधाव वेगाने येतांना दिसले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशय आला. पथकातील कर्मचाऱ्यांनी हात देवुन वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे नेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने वाहन ताब्यात घेतले. चालक व क्लिनर शाहरुख नजिर मण्यार (वय २४ रा. म्हसावद, ता. शहादा) व बाळु महादु डामरे (वय ४८, रा. अभय कॉलेज रोड, धुळे) असे नावे सांगितले.

Wine spirit
सातपुड्यात निसर्ग देव वाघदेव, निलपी सण उत्सवाची लगबग

ताब्‍यात घेतलेला माल असा

वाहनांची तपासणी केली असता त्यात बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीटने भरलेल्या ११ प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या. त्यांना परवाना विचारला असता त्यांनी परवाना नसल्‍याबाबत सांगितले. यामुळे ५ लाख ५० हजार रुपये किमंतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीट व ६ लाख रुपये किमतीची गाडी असा एकुण ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपीतांविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com