Satpuda
Satpuda

सातपुड्यात निसर्ग देव वाघदेव, निलपी सण उत्सवाची लगबग

सातपुड्यात निसर्ग देव वाघदेव, निलपी सण उत्सवाची लगबग
Published on

नंदुरबार : पावसाळा सुरू झाला की सातपुड्यातील आदिवासी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे वाघदेव, निलपीदेव, आयखेडादेव आदी देवतांची पुजन करण्यात येते. उत्‍सवाला अद्याप पंधरा दिवस बाकी असून आदिवासी बांधवांकडून या उत्‍सवाची तयारी सुरू आहे. (Nandurbar-news-Satpuda-nature-god-Waghdev-Nilpi-festival-is-almost-celebrated)

आदिवासी संस्कृतीप्रमाणे या सणाला जंगल, जमीन, पाणी आदींचे संवर्धन करून आदिवासी बांधव जंगलात जगत असतो. आदिवासीच्या अनेक सणांपैकी अति महत्वाचे समजले जाणारे बाबदेव, वाघदेव, निलपी, आयखेडा इ. निसर्ग पुजन हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणासाठी पंधरा ते वीस दिवसा अगोदरपासून सण साजरा करण्याची तयारी चालू असते.

Satpuda
परिचारिकांवरील लेखाविरोधात धुळ्यात परिचारिका संघटना आक्रमक

गावपंच एकत्र येवून मांडतात ठराव

वाघदेव, निलपीदेव साजरा करण्यासाठी गावाचे पोलीस पाटील यांच्या आदेशाने गावातील एक गाव कोतवाल नेमूण गावात दंवडी देऊन बैठक बोलविली जाते. बैठकीत वाघदेव, निलपी, आयखेडा इ. गावदेवाच्या पुजनासाठी गावपंच एकत्र येवून ठराव मांडतात. मांडलेला ठरावानूसार गावदेव साजरा करण्यासाठी सर्व गावातील कुटूंबाकडून वर्गणी आकारली जाते. त्या एकत्रीत वर्गणीतून या सणाला लागणारे वेगवेगळे साहित्य व पदार्थ तसेच आपआपल्या घरातील अनेक प्रकारचे ५०० ग्रॅम धान्य एका कापडात घेऊन सर्व ग्रामस्था समक्ष गावाच्या पुजारीकडून देवाला पुजन केले जाते.

पुजनावेळी केली जाते आराधना

पुजनावेळी गावचे आरोग्य चांगले राहवे, शेतीतील पीके चांगली यावी, कोणतीही अडचण गावात येवू नये, तसेच डोंगरातील- शेतीतील नवनविन राणभाज्या, कंदमुळे आदी खाण्यासंदर्भात गावदेवाकडे आरधना केली जाते. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाने समाधानकारक पावसाची हजेरी लावल्याने सातपुड्यातील आदिवासी बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे निसर्ग देवतांची सण- उत्सवांची लगबग सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com