Shahada Panchayat Samiti: संख्याबळ व सत्ता असूनही अंतर्गत वादामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर; भाजपची सत्‍ता

संख्याबळ व सत्ता असूनही अंतर्गत वादामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर; चार सदस्‍य फुटल्‍याने भाजपची सत्‍ता
Shahada Nandurbar News
Shahada Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : संख्याबळ जास्त असुनही अंतर्गत वादामुळे शहादा पंचायत समितीत कॉग्रेसला (Congress) सत्ता काबीज करता आली नाही. शहादा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी आणि उपसभापतीपदी भाजपच्या (BJP) उमेदवारांची विजय झाला आहे. (Live Marathi News)

Shahada Nandurbar News
Dhule News: पंचायत समिती सभापती निवड; भाजप– शिंदे गटाचा विजय निश्चित

शहादा (Shahada) पंचायत समितीमध्ये २८ सदस्य संख्या असून कॉग्रेसचे 14, (NCP) राष्ट्रवादीचे २, तर भाजपचे १२ असे संख्याबळ आहे. मात्र आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच १४ सदस्य आणि राष्ट्रवादीचा १ असे १५ सदस्य अनुपस्थित राहीले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपचे विरसिंग ठाकरे यांची निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपच्या कल्पना श्रीराम पाटील यांची निवड झाली आहे.

कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांचा धक्‍का

विजयी उमेदवारांना भाजपचे १२ आणि राष्ट्रवादीचे १ असे १३ मते मिळाली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडुन तब्बल ४ अर्ज देखील दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे काही सदस्य भाजपच्या गळ्याला लागल्याने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी कॉग्रेसचे संख्याबळ जास्त राहुनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्याचे माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी आणि पद्माकर वळवी यांना हा झटका मानला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com