Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: पंचायत समिती सभापती निवड; भाजप– शिंदे गटाचा विजय निश्चित

पंचायत समिती सभापती निवड; भाजप– शिंदे गटाचा विजय निश्चित
Published on

धुळे : धुळे जिल्ह्यातील आज चार ग्रामपंचायत सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व (शिंदे गटाची) बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) असे चित्र बघायला मिळत आहे. (Maharashtra News)

Dhule News
Crime: मुलीला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळ्यात (Dhule) भाजपला (BJP) बहुमत असताना देखील शिंदे गटाच्या पाठिंब्यावर सभापती पदासाठी वंदना रतन मोरे व उपसभापती पदासाठी देवेंद्र गोकुळ माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी मिनाबाई साहेबराव सोनवणे यांनी उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) योगीराज प्रताप पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप– शिंदे गटाचा विजय निश्चित

संख्या बलाबल बघता भाजप व शिंदे गट शिवसेना यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या संदर्भात काही तासात निवड प्रक्रिया पार पडणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com