Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचे निघणार आरक्षण; सोडतची तारीख झाली जाहीर

Nandurbar News : ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने त्यांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठीच कर्यक्रम जाहीर झाला आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. १५ ग्रामपंचायतची (Gram Panchayat) आरक्षण सोडत ४ एप्रिल रोजी होणार आहे. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर लवकरच (Nandurbar) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहेत.  (Latest Marathi News)

Nandurbar News
Jalgaon Temperature : जळगाव तापले; पारा पोहचला ४० अंशाच्यावर

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आहे. यामुळे यावर प्रशासक बसले आहेत. याच दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचे असलेले राखीव आरक्षणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने त्यांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. (Gram Panchayat election) यासाठीच कर्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ४ एप्रिलला आरक्षण काढण्यात येणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Kalyan News : क्षुल्लक कारणावरून दिव्यांग मुलासह पती- पत्नीला मारहाण; कल्याणमधील धक्कादायक घटना

सरपंच निवड थेट जनतेतून 

आरक्षण सोडत कार्यक्रम शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. (Sarpanch) सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने आरक्षणाला मोठे महत्व आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. अशा ग्रामपंचायतीतील नागरिकांना आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली आहे.  त्यामुळे ४ एप्रिल रोजी होणाऱ्या आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे ग्रामपंचायत येथील उमेदवारांच्या लक्ष लागून राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com