Rain Update: नंदुरबारमध्‍ये परतीच्या पावसाची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान

नंदुरबारमध्‍ये परतीच्या पावसाची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान
Nandurbar Rain Update News
Nandurbar Rain Update NewsSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध भागात परतीच्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. शहादा (Shahada) तालुक्यात आज दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Live Marathi News)

Nandurbar Rain Update News
Nandurbar: कर्जफेडीनंतरही दुपटीने कर्ज वसुली; नंदुरबारमध्‍ये फायनान्स कंपन्यांविरोधात मोर्चा

जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेसह (Nandurbar) नंदुरबार आणि नवापूर (Navapur) तालुक्यात देखील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिकांचे मोठे नुकसान

दरम्यान परतीच्‍या झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर शहादा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याच पाहायला मिळाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com