नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी कर्ज वितरित करणाऱ्या कंपन्यांकडून कर्जफेड केल्यानंतरही दुपटीने कर्ज वसुली केली जात आहे. या फायनान्स कंपनी विरोधात भिल्लीस्तान लाईन सेनेचा जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा काढला. महिला बचत गटांना फायनान्स देणाऱ्या कंपन्या अवाजाची व्याज आकारून कर्जफेड केल्यानंतरही वसुली सुरु असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (Letest Today News)
शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणासाठी बचत गट महिलांना आर्थिक सहाय्य करून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यात महिला बचत गटांकडून काही खाजगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात आहे.
घरांतून नेले दागिने अन् भांडे
काही महिला बचत गटांचे कर्ज फेड झाल्यानंतरही दमदाटी करून कर्ज वसुलीची धमकी दिली जात आहे. यापुढे तुम्हाला बँक फायनान्स कर्ज मिळू देणार नाही तुम्ही हे हप्ते फेड केले पाहिजे. अशी जबरदस्ती फायनान्स कंपन्यांकडून केली जात आहे. सदर फायनान्स कंपन्यांकडून गावपाड्यावरील महिलांच्या अंगावरील चांदीचे व पायातील साखळ्या काढून नेल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहे. तसेच अनेक घरांमधून स्वयंपाकाची भांडी व घराला कुलूप लावून ताब्यात घेण्याचे प्रकार समोर आले आहे. या सर्व कर्ज वसुलीसाठी सदर फायनान्स कंपन्यांकडून गुंडगिरी प्रवृत्तीच्या व्यक्ती कडून कर्ज वसुलीचे धमकी दिली जाते.
हद्दपारीची मागणी
जोर जबरदस्तीने महिला बचत गटांकडून जास्त व्याज व कर्ज वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना जिल्ह्यातून हद्दपार करून तडीपार करत कारवाई करावी; अशी मागणी भिल्लीस्तान लायन सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सदर फायनान्स कंपन्यावर प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.