काँग्रेस नेत्यांची उद्घाटनासाठी लगीनघाई; नियोजित वेळेच्या आधीच शाळेचे ऑनलाईन उद्घाटन

काँग्रेस नेत्यांची उद्घाटनासाठी लगीनघाई; नियोजित वेळेच्या आधीच शाळेचे ऑनलाईन उद्घाटन
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : सातपुडा तोरणमाळ दुर्गम- अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय व्हावी यासाठी तब्बल १६०० क्षमतेची निवासी तोरणमाळ इंटरनॅशनल स्कूल उभारण्यात आली आहे. सदर स्कूलचे उद्घाटन २४ जूनला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजित होते. मात्र सद्यस्थितीत राज्यभरात घडत असलेल्या राजकीय नाट्याचा परिणामात इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यावर झाला आहे. बुधवारी नियमितपणे विविध विभागांमध्ये सर्व विभागांचे कामकाज सुरु असतांना अचानक दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास (Nandurbar News) तोरणमाळ इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन होणार असल्याचा फतवा आला. (nandurbar news Online opening of the school ahead of schedule Congress leaders)

Nandurbar News
मोठी बातमी! धनुष्यबाणाचं चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे करणार अर्ज

अचानक आलेल्‍या फतव्‍याने काही वेळ अधिकारीही गोंधळले होते. वरिष्ठ पातळीवरुन आदेशाचे पालन करण्यात आले आणि घाईघाईने अर्ध्या तासातच इंटरनॅशनल स्कूलचे ऑनलाईन उद्घाटन (Nandurbar ZP) नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कार्यालयातच करण्यात आले. हा महाप्रताप (Congress) काँग्रेसचे नेते शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी केला आहे. या उद्घाटनाबाबत स्थानिक नागरिक, पदाधिकारी, पत्रकार कोणालाही माहिती देण्यात आलेली नव्हती. काँग्रेस नेत्यांना उद्घाटनाची लगीनघाई का लागली आहे? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कदाचित काँग्रेस नेत्यांना हे कळून चुकले आहे; की महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय उलथापालथीत काँग्रेस पुन्हा सत्तेत कधीही येणार नाही. त्यामुळेच उद्घाटनाची लगीनघाई केली असावी.

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम- अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय व्हावी; यासाठी तोरणमाळ येथे भव्य इंटरनॅशनल स्कूलची इमारत कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आली असून १६०० इतक्या विद्यार्थी क्षमता आहे. सन २०१७ पासून सदर इमारतीचे काम सुरु होते. मार्च महिन्यातच काम पूर्ण झाल्यानंतर सदर इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली होती. त्यानुसार सद्यस्थितीत १ हजार ६८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून सोळाशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या दुर्गम भागातील इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कार्यालयातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ऑनलाइन घाईघाईत उरकवल्याने उद्घाटनाची चर्चा तर होणारच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com