भर पावसात झोपडी झाली भूईसपाट; आजी आजोबांची स्थिती पाहून नेटकरीही भावूक

आजी आजोबा अद्यापही मदतीपासून वंचित...
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv
Published On

नंदुरबार - अतिवृष्टीत भर पावसात वयोवृद्ध दांपत्याचे कौलारू घर भुईसपाट झाल्याने आजी आजोबांनी छत्री खाली आसरा घेत पावसाचा सामना केला. सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायत अंतर्गत मोकस येथील रहिवासी सीता डुअल्या वसावे, पत्नी गुलबी सीता वसावे आणि मुलगा आमर्या सिता वसावे यांचं लहानसं कौलारू घर नदीकिनारी होतं. १० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत भर पावसात (Rain) घर कोसळून भुईसपाट झालं आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूंचे 90 टक्के नुकसान झाले आहे.

हे देखील पाहा -

या दुर्घटनेत मुलगा आमर्या याला डोक्याला जबर मार लागला असून जखमी झाला आहे. नदी नाल्यांना आलेला पूर धो धो पडणाऱ्या भर पावसात आजी आजोबाचे घर जमीनध्वसत झाल्याने छत्री खाली आसरा घेण्याची वेळ आली होती. शेजारी नातेवाईकांनी आजी-आजोबा व जखमी मुलाला मदत करत तात्पुरता आसरा दिला आहे. आजी आजोबा अत्यंत गरीब परिस्थितीत असून डोक्यावरच छतही पावसात कोसळून भुईसपाट झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. आजी आजोबा व मुलाला पुढील आयुष्य साठी मदतीची गरज आहे.

Nandurbar News
All The Best! आज ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल, येथे पाहा निकाल

अतिवृष्टीमुळे वडफळी ग्रामपंचायत अंतर्गत आश्रम शाळा व इतर पाड्यांवर प्रचंड नुकसान झाले आहे. रस्ते, घरे, विद्युत पोल झाडे यांचेही मोठं नुकसान झालं आहे दळणवळणाची सोय ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी मनुष्य खत्री यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्गम भागाचा दौरा करून मदतीचे आश्वासन दिले असले तरी अनेक भागात पंचनामे करून मदतीपासून नागरिक वंचित असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीत बाधित झालेल्या नागरिकांना शासन प्रशासनाने दिलासा देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com