All The Best! आज ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल, येथे पाहा निकाल

सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे.
ICSE Result
ICSE ResultSaam Tv
Published On

नवी दिल्ली - आज आयसीएसई बोर्ड (ICSE Board) परीक्षेचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सत्रांना समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.निकाल तपासण्यासाठी विद्यार्थी डिजिलॉकर अॅप किंवा एसएमएस वापरू शकतात. यासाठी विद्यार्थी https://results.cisce.org/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.

हे देखील पाहा -

कोरोना परिस्थितीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोन मधील एकही परीक्षा दिली नसेल त्यांचा अनुपस्थित म्हणून जाहीर केला जाणार आहे.

ICSE Result
...हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर, टाळेबंदी करण्याचा डाव, सामनातून मोदी सरकारवर टीका

असा पाहा निकाल

आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.

त्यानंतर येथे तुमचा युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करा.

आता तुम्हाला निकाल पाहता येईल.

याशिवाय तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता.

यासाठी तुम्हाला ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे तुम्हाला निकाल पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com