Naylon Manja : नायलॉन मांजाने थोडक्यात वाचला तरुणाचा जीव; बंदी असतानाही होतोय वापर

Nandurbar News : मकर संक्रांत सणाच्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर पतंग उडवत असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून नायलॉन मांजाच्या वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जीवितहानीचे प्रकार देखील समोर येत आहे.
Naylon Manja
Naylon ManjaSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांचे देखील जीवितहानी होत असते. त्यामुळे नायलॉन मांजा बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात विक्री होत आहे. नायलॉन मांजामुळे (Chinese Manja) सायकलवरून जाणाऱ्या तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे. (Live Marathi News)

Naylon Manja
Shiv sena Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संपर्कप्रमुख हटविण्याचा आजी माजी पदाधिकाऱ्यांची मागणी

नंदुरबार जिल्ह्यात गुजरात राज्य प्रमाणेच मकर संक्रात सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मकर संक्रांत सणाच्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर पतंग उडवत असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून नायलॉन मांजाच्या वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जीवितहानीचे प्रकार देखील समोर येत आहे. असाच एक प्रकार शहादा (Shahada) तालुक्यातील खेडदिगर येथील राजू शिंदे याच्यावर घडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Naylon Manja
Dipak Kesarkar News : मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आम्ही बनवणार; मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

नायलॉन मांजा बंदी असताना देखील नंदुरबार जिल्ह्यात विक्री होत आहे. दरम्यान राजू शिंदे हा युवक कामानिमित्त सायकलवरून जात असताना मांजाचा दोरा अंगाशी आला. परंतु राजू शिंदे याने यातून सुटका केल्याने थोडक्यात जीव वाचला. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांचे देखील जीवितहानी होत असते. मोटरसायकलने प्रवास करत असताना सर्व्यानी काळजी घेण्याचं आवाहन हा तरुण सोशल मीडियाचा माध्यमातून संदेश देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com