Navapur News
Navapur NewsSaam tv

Navapur News: जीव धोक्यात टाकून गॅस वाहनात भरण्याचा प्रकार; पोलीसांच्या छाप्यात ४० गॅस सिलिंडर जप्त

जीव धोक्यात टाकून गॅस वाहनात भरण्याचा प्रकार; पोलीसांच्या छाप्यात ४० गॅस सिलिंडर जप्त
Published on

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापुर शहरात अनधिकृत पद्धतीने भरले जाणाऱ्या गॅस कारखान्यावर पोलिसांनी (Police) छापा टाकला. या कारवाईत घरगुती आणि व्यवसायिक ४० सिलेंडर आढळून आले आहेत. (Latest Marathi News)

Navapur News
Sangli Crime News : भरदिवसा नाशकातील व्यापा-याचे एक कोटी दहा लाख लुटले; तासगावात खळबळ, एसपी तेली घटनास्थळी

नवापूर शहरातील सरदार चौकातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर भरत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना गोपनीय मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नवापूर (Navapur) पोलिसांनी एका घरात तपासणी केली असता घरगुती आणि व्यवसायिक असे ४० सिलेंडर आढळून आले. तर त्यासोबत वाहनात गॅस भरण्यासाठीचे युनिट, 2 मोटरी, एक वजन काटा आधुनिक साहित्य पोलिसांना मिळून आले.

Navapur News
Nitin Gadkari Threat Case: '...म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली' आरोपी जयेश पुजारीचा खळबळजनक खुलासा

साहित्‍यासह एक ताब्‍यात

पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी पार केले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पद्धतीने गॅस भरून वाहनात धोकेदायक पद्धतीने भरून वाहतूक सुरू होती. या छाप्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र या आरोपीकडून आणखीन सिलेंडर आढळून येण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com