Nitin Gadkari Threat Case: '...म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली' आरोपी जयेश पुजारीचा खळबळजनक खुलासा

Nitin Gadkari News: पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, त्यामुळेच त्याने नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला आहे..
Ntin Gadakari Latest News
Ntin Gadakari Latest NewsSaam Tv
Published On

Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी जयेश पुजाराला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जयेश पुजारा याला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणण्यात आले आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे.

पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती, असा खुलासा त्याने केला आहे. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Ntin Gadakari Latest News
Road Show Viral Video: रोड शो दरम्यान काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे, व्हायरल झाला व्हिडिओ

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Minister Nitin gadkari) कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं (Jayesh Pujari) बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं, अशी त्याची योजना असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

Ntin Gadakari Latest News
Uttar Pradesh Crime News: बदनामीच्या भितीने भयंकर घडलं! आधी शिक्षक लेकीची गोळ्या झाडून हत्या अन् स्वतःही संपवले आयुष्य

या चौकशीमध्ये धमकीचे फोन करण्यामागे  प्रकाश झोतात येण्याची योजना होती असे जयेश पुजारीने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र पोलिस त्याच्या या खुलाश्यावर समाधानी नसून त्याची आणखी कसून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com