Panchayat Samiti: नंदुरबार, धडगाव पंचायत समितीवर शिंदे गटाचे वर्चस्व; भाजपचा पराभव

नंदुरबार, धडगाव पंचायत समितीवर शिंदे गटाचे वर्चस्व; भाजपचा पराभव
Nandurbar Shahada News
Nandurbar Shahada NewsSaam tv
Published On

नंदुरबार : राज्यात नंदुरबार पंचायत समितीच्या रुपाने शिंदे गटाच्या ताब्यात पहिली पंचायत समिती आली आहे. आज झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या माया ताराचंद माळसे या सभापती पदी तर शितल धर्मेद्रसिंग परदेशी या उपसभापती पदी निवडुन आल्या आहेत. (Maharashtra News)

Nandurbar Shahada News
Shahada Panchayat Samiti: संख्याबळ व सत्ता असूनही अंतर्गत वादामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर; भाजपची सत्‍ता

नंदुरबार पंचायत समितीच्‍या सभापती, उपसभापती निवडीत शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांना ११ तर विरोधी भाजप उमेदवारांना ८ मते मिळाली आहे. तर भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहीला. या आधी नंदुरबार पंचायत समितीवर भाजपची सत्ता होती. मात्र पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गटाने बाजी मारत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर आज अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने पंचायत समितीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. या विजयानंतर शिंदे गटाकडुन जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.

धडगावमध्‍ये शिंदे गटाचा झेंडा

नंदुरबार पंचायत समिती पाठोपाठ धडगाव पंचायत समितीवर देखील शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. धडगाव पंचायत समितीच्या सभापती शिंदे गटाच्या हिराबाई रविंद्र पराडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापती पदी शिंदे गटाच्या भाईदास अत्रे यांची निवड झाली आहे. १४ सदस्‍यांच्या धडगाव पंचायत समितीमध्ये शिंदे गटाचे ८ तर विरोधी कॉग्रेसचे ६ संख्याबळ आहे. त्यामुळे आज झालेल्या सभापती उपसभापती निवडणुकीमध्ये कॉग्रेसने अर्ज दाखल न केल्याने शिंदे गटाच्या उमेदवारांची सभापतीपदी आणि उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com