नंदुरबार : धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्गावर संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. यात आज सकाळी विसरवाडी गावाजवळ नंदुरबार– डहाणू बसचा अपघात (Accident) झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहाणी झाली नाही. (Nandurbar news Nandurbar Dahanu msrtc bus accident)
नंदुरबारहून (Nadurbar) नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली. बस (St Bus) चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली. त्यात बस मातीत फसली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमधील लहान बालके व महिलांना पाच ते सहा प्रवाश्यांना किरकोळ मुक्कामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
प्रवाशांना घेवून बस रवाना
महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात बस असल्याने ट्रॅक्टरला टोचन लावून बसला बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांना बसवून बस रवाना करण्यात आली. धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामात अनेक अनियमितता असल्याने नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे; याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.