Maharashtra Politics : विधानसभेआधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी? राजेंद्रकुमार गावित यांचा सर्वात मोठा निर्णय

Rajendra Kumar Gavit News : विधानसभेआधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. कारण, शहादा-तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच भाजप नेते राजेंद्रकुमार गावित यांनी केली आहे.
Rajendra Kumar Gavit News
Rajendra Kumar Gavit News Saam TV
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार

लोकसभा निवडणुकीचा गुलाल खाली पडल्यानंतर आता विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासून तिकीटासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच काही नेत्यांमध्ये वादाचे फटके फुटत आहेत. पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार, असं म्हणत अनेकांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे.

अशातच विधानसभेआधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. कारण, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, अशी घोषणाच भाजप नेते राजेंद्रकुमार गावित यांनी केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Rajendra Kumar Gavit News
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; कट्टर शिवसैनिक आज शिंदे गटात प्रवेश करणार

राजेंद्रकुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. 2014 मध्ये त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले. आता आगामी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच असं गावित यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर विकासकामांच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजप आमदार राजेश पाडवी यांच्यावर टीकेची झोड देखील उठवली आहे.

काय म्हणाले राजेंद्रकुमार गावित?

राजेंद्रकुमार गावित यांनी शुक्रवारी तळोदा तालुक्यातील बोरद येथे कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली. या बैठकीला अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून मतदार संघातील समस्या विषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांनी तर मतदारसंघात गावगुंडांची दादागिरी सुरू असल्याचेही चर्चेद्वारे सांगितले.

रोजगाराअभावी आदिवासी बांधवांचे स्थलांतर सुरूच आहे. आजही त्यांना रोजगारासाठी परराज्यात जावे लागते. तालुक्यातील सहकार तत्वावरील अनेक प्रकल्प सध्या बंद आहेत. त्यामुळे रोजगार शोधण्याची वेळ मतदारसंघातील नागरिकांवर आल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी काहींनी मतदारसंघातील मूलभूत समस्यांच्या पाढा वाचला.

शेतकरी बांधवांनाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ठिबकचे अनुदान नाही, कर्जमाफीचे पैसे अद्यापही काहींना मिळाले नाही. योजनांचाही लाभ मिळवण्यासाठी सर्वत्र फरपट होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा आमदार हवा अशी साद कार्यकर्त्यांनी घातली. यानंतर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे राजेंद्रकुमार गावित यांनी स्पष्ट केले.

Rajendra Kumar Gavit News
Maharashtra Politics: विधानसभेसाठी हिदुत्ववादी पक्षांना मुस्लिमप्रेम? नितेश राणेंच्या भूमिकेचा महायुतीला धसका?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com