Nandurbar News : दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ११ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Nandurbar News : नंदुरबार शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करत कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून चोऱ्यांची घटनेत वाढ झाली आहे. यामुळे नंदुरबार पोलीस दलातर्फे रात्री नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. या दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करत कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील जगतापवाडी चौफुलीजवळ असलेले डुबकेश्वर महादेव मंदिरजवळ पाच संशयित व्यक्तींना पकडण्याच्या प्रयत्न पोलिसांनी (Police) केला. मात्र यातील एक आरोपी अंधाराच्या फायदा घेत फरार झाला असून चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या ताब्यातील बॅगमध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल 2 जिवंत काडतूस, एक लोखंडी गुप्ती व एक पांढऱ्या रंगाची दोरी व ११ लाख १५ हजार ८३० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

Nandurbar News
Vijaykumar Gavit News : मत मिळविण्यासाठी योजना बंद पडण्याचे विरोधकांकडून खोटे आरोप; मंत्री विजयकुमार गावित

नागपूरहून चोरी करून आले नंदुरबारात 

पोलिसांनी त्यांची अधिक विचारपूस केल्यानंतर नागपूर (Nagpur) येथे घरफोडी केले असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. तसेच चारही आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासी असून नागपूर येथून चोरीच्या माल घेऊन आपल्या गावी परत आले होते. त्र नंदुरबार शहरात देखील चोरीच्या कट रचल्याचे समोर आले आहे. पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे नागपूर येथे झालेल्या चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com