सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सकल भागात पुराचे पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यानं नद्यांचे स्वरूप आले असून शहादा शहरात असलेल्या पोलीस स्टेशन आवारात पूर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पहाटेच्या सुमारास देखील जोरदार पाऊस झाला. यामुळे काही मिनिटातच रस्त्यावर पाणी साचून रस्त्यानं जणूकाही नद्यांचे स्वरूप आले होते. शहादा (Shahada) शहरात देखील हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. पहाटे आलेल्या पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून शहादा शहरातील कोर्ट परिसरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नगर पालिकेचे नाले सफाई न केल्याने गटारी ब्लॉक झाल्याने हे पाणी रस्त्यांवर आले होते.
यासोबतच शहरानजीक असलेल्या भेंडवा नाल्याला पूर आल्याने या नाल्याचे पाणी संपूर्ण शहरात शिरल्याने अनेक भागात घरांना (Heavy Rain) आणि दुकानात पाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. भेंडवा नाल्याची खोलीकरण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून न केले गेल्याने नाल्याचे पाणी आता शहादा शहरात यायला लागलं असून शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवर पुराचे पाणी शिरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.