नंदुरबार : शहरातील पटेलवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत साडे सहा लाखाचा अवैद्य गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी एकास अटक केली आहे. अब्दुल हमीद शेख रा. पटेलवाडी, नंदुरबार (Nandurbar) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. (nandurbar news gutkha worth Rs six and half lakh seized in Nandurbar)
जिल्हा (Police) पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील पटेलवाडी अवैधरीत्या साठवणूक केलेल्या घराची झडती घेतली. घराच्या एका कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या आढळून आल्या. यावेळी पथकाला संशय बळावल्याने अब्दुल शेख यास उग्र वास कशाचा येत आहे; अशी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
९ हजार ३०० पाकिटे सापडली
पोलिसांनी उग्र वास येत असलेल्या पोत्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये विविध कंपनीच्या सुगंधित तंबाखूची 6 लाख 42 हजार 300 रुपये किमतीची 9 हजार 327 पाकिटे आढळून आली. गुन्ह्यातील आरोपी अब्दुल हमीद शेख यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.