Plastic Ban: दोन कंपन्या सील; आठवडाभरात ५ टन प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बॅन; दोन कंपन्या सील, आठवडाभरात ५ टन प्लास्टिक जप्त
jalgaon corporation
jalgaon corporationSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरात प्‍लास्टिक बंदीची कारवाई केली जात आहे. यात प्‍लास्टिकचा वापर करणारे तसेच तयार करणाऱ्या कंपन्‍यांवर देखील कारवाई केली जात आहे. यात मागील आठवड्यात जळगावच्‍या (Jalgaon) औद्योगिक वसाहत परिसरातील दोन कंपन्‍या सील केल्‍या आहेत. (jalgaon corporation news Plastic bans Two companies seal seize 5 tonnes of plastic)

jalgaon corporation
पहिली ते सातवीला आता सातऐवजी एकच पुस्तक

राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी (Plastic Ban) घातली आहे. तरीही महापालिकेकडून कोणतीही मोठी कारवाई केली जात नव्हती. मनपाचे तत्कालीन उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या कार्यकाळात महापालिकेकडून (Jalgaon Corporation) प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाईची मोहीम हाती घेऊन सुमारे ३ लाखांचा दंड देखील वसूल केला होता. मात्र महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्या कानाडोळा केल्याचे दिसून आले. आता आयुक्‍त विद्या गायकवाड यांनी कार्यभार घेतल्यानंतर प्लास्टिक निर्मिती करण्यासोबत विक्री व वापरणार यावर धडक कारवाई सुरू केली आहे.

५० टन प्लास्टिक जप्‍त

महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरात अनधिकृतपणे प्लास्टिक वापरणारे व प्लास्टिक तयार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवडाभरात मनपा प्रशासनाकडून ५० टन प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला असून एमआयडीसीमधील प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या दोन कंपन्यादेखील सील करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com