आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा; समस्‍यांनी त्रस्‍त

आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा; समस्‍यांनी त्रस्‍त
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धडगाव तालुक्यातील सुरवाणी आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणावर समस्या असून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत सुरवाणी धडगाव येथील आदिवासी वसतीगृहातील (Student) विद्यार्थ्यांनी थेट तळोदा प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढत प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घालत समस्यांचा पाढा वाचला. (nandurbar news Foot march of students from tribal hostels)

Nandurbar News
हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडले

धडगाव सुरवाणी आदिवासी मुलांच्या वसतीगृहात (Nandurbar News) पाण्याची समस्या मोठी असल्याने पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी अडचण निर्माण होते. शौचालय बाथरूम व वसतीगृहाच्या परिसरात साफसफाई नसल्याने रोगराई पसरण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. वसतीगृहात विजेचा प्रश्न देखील गंभीर आहे. विद्यार्थ्यांना अद्याप भत्ता (डीबीटी) मिळालेला नाही. शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी तत्काळ भत्ता मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.

वार्डन, शिपाईच्‍या बदलीची मागणी

धडगाव सुरवाणी वस्तीगृहातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे इथले अधीक्षक- वार्डन, शिपाई आणि चौकीदार विद्यार्थ्यांच्या समस्याकडे पूर्णता दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्यास आम्हाला सांगू नये, तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जा; अशी उत्तरे वार्डन, शिपाई व चौकीदार यांच्याकडून दिली जातात. त्यामुळे सुरवाणी आदिवासी वस्तीगृहातील तमाम विद्यार्थ्यांनी वार्डन, शिपाई आणि चौकीदार यांची तात्काळ बदली व्हावी अशी मागणी केली आहे.

प्रकल्‍प अधिकारीकडून लेखी आश्‍वासन

पायी मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांनी तळोदा सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी.एफ. वसावे यांना निवेदन दिले. यानंतर तत्काळ त्यांनी लेखी आश्वासनाद्वारे वार्डन, शिपाई, चौकीदार यांची बदली करण्याची कार्यवाही केली जाणार. तसेच डीबीटी आणि विजेच्या प्रश्नाबाबत सबंधित कार्यालयाशी संपर्क साधून तत्काळ समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com