नंदुरबार : आघाडी झालीच तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवू. सन्मानाने सर्वपक्षीय निवडणूक लढविण्यास अडचण नाही. परंतु, प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. भाजपसोबत जायचे नाही असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. (nandurbar-news-Dhule-Nandurbar-Bank-election-is-not-with-BJP-mahavikas-aaghadi)
नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या गटातून नामांकन दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रघुवंशी म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर त्याच माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहे. पालकमंत्री ॲड के.सी पाडवी व आ.कुणाल पाटील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.
२३ वर्ष झाली तरी
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही जिल्हा बँकेचे विभाजन न झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. धुळे– नंदुरबार संयुक्त बँकेचे आधी विभाजन करा, मगच निवडणूक घ्या अशी भूमिका असतानाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी सुरू आहे.
नेते कमी पडताय
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या आधी नंदुरबार– धुळे संयुक्त असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र करण्यात यावी; अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली होती. परंतु नंदुरबार जिल्ह्यासाठी संयुक्त बँक करण्यासाठी जिल्ह्यातील नेते कमी पडल्याचे खंत देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे.
अर्ज भरण्यास सुरवात
धुळे नंदुरबार बँकेसाठी एकूण १७ संचालक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यातूनही नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उद्या (ता.२०) नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असून ८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडून २२ नोव्हेंबर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.