अगोदर वाटले कुत्र्याचे पिल्लू; परंतु भरवस्तीत फिरणारे होते ते दोन कोल्हे

अगोदर वाटले कुत्र्याचे पिल्लू; परंतु भरवस्तीत फिरणारे होते ते दोन कोल्हे
Fox
Fox
Published On

नंदुरबार : धडगाव शहरातील रहिवासी वस्तीत २ कोल्ह्याचे नवजात पिल्लू आढळून आले आहेत. ही पिल्ले आदिवासी जनजागृती टीमच्या सहाय्याने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. (nandurbar-news-dhadgaon-city-moving-around-two-foxes-puppies)

Fox
लाज कशाची वाटती सांगून टाका; शिवेंद्रराजेंचे उदयनराजेंना आवाहन

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव (Dhadgaon) तालुका व परिसरात दिवसेंदिवस कमी होत असलेले जंगल व शहरातील रहिवासी वस्ती वाढत असल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. धडगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालय परिसरात दोन नवजात कोल्ह्याचे (Fox) पिल्लू खेळणाऱ्या लहान मुलांना दिसून आले. सदर कोल्ह्याचे पिल्लू परिसरात असलेल्या कुत्र्यांबरोबर फिरत असल्याने मुलांना प्रथम दर्शनी कुत्र्याचे पिल्लू वाटले. परंतु त्यांचा आवाज व कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा वेगळे दिसत असल्याने मुलांच्या मनातही कुतूहल निर्माण झाले.

मुलांनी सांगितले घरात

याबाबत मुलांनी घरातील वरिष्ठ व्यक्तींना सांगितले असता सदर पिल्ले कुत्र्याचे नसून कोल्ह्याचे असल्याचे समजले. यानंतर जयंतीलाल ब्राह्मणे आणि सोन्या पटले या दोन तरुणांनी सदर पिल्लांबाबत धडगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या आदिवासी जनजागृती टीमला संपर्क करून त्यांच्या मदतीने सदर कोल्ह्याचे पिल्ले धडगाव वन विभागाच्या ताब्यात दिल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. धडगाव वनक्षेत्रपाल ए. एस. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल तडवी आणि गुलाबसिंग तडवी यांनी तत्परता दाखवत सदर कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेत तरुणांचे आभार मानले. तसेच रहिवासी वस्तीत किंवा जंगलात वन्य प्राणी जखमी अवस्थेत किंवा त्यांची पिल्ले एकट्या अवस्थेत आढळल्यास वन विभागाला संपर्क करण्याचे आव्हान देखील केले आहे.

मुलांची घराकडे धाव

याबाबत मुलांनी घरातील वरिष्ठ व्यक्तींना सांगितले असता सदर पिल्ले कुत्र्याचे नसून कोल्ह्याचे असल्याचे समजले. यानंतर जयंतीलाल ब्राह्मणे आणि सोन्या पटले या दोन तरुणांनी सदर पिल्लां बाबत धडगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या आदिवासी जनजागृती टीमला संपर्क करून त्यांच्या मदतीने सदर कोल्ह्याचे पिल्ले धडगाव वन विभागाच्या (Forest Department) ताब्यात दिल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. धडगाव वनक्षेत्रपाल ए. एस. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल तडवी आणि गुलाबसिंग तडवी यांनी तत्परता दाखवत सदर कोल्ह्याच्या पिल्लांना ताब्यात घेत तरुणांचे आभार मानले. तसेच रहिवासी वस्तीत किंवा जंगलात वन्य प्राणी जखमी अवस्थेत किंवा त्यांची पिल्ले एकट्या अवस्थेत आढळल्यास वन विभागाला संपर्क करण्याचे आव्हान देखील केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com