नंदुरबार : राज्यातील शहरी भागात एकीकडे चौकाचौकात कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination) अगदी सहज उपलब्ध आहे. दुसरीकडे अतिदुर्गम अशा आदिवासी वस्ती व पाड्यांवर मात्र लसीकरणासाठी मेहनत घ्यावी लागतेय. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा किनाऱ्यांवर असणारे वाडे पाडे गाठण्यासाठी जीप मग बोट, अॅम्ब्युलन्स आणि त्यांनतरही पायपीट करुन लोकांच्या घरापर्यत जावुन लसीकरण करणारी ही सारी यंत्रणेबद्दल खास वृतांत.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात अतिदुर्गम भागात जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्र वसलेले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघणार हा आरोग्य कर्मचारी यांची हि टिम जात आहे. ती अतिदुर्गम भाग असणाऱ्या नर्मदा काठावरील वाड्या पाड्यांवर लसीकरणासाठी सुरवातीला डोंगर दऱ्यातून अतिशय जीवघेण्या घाट रस्तांमधून अशा पद्धतीने गाडीतुन तब्बल दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करुन आरोग्य विभागाची टिम पोहचत आहे. नर्मदा किनारी वसलेल्या चिमलखेडी गावात मग येथुन सुरू होतो तो तंरगता दवाखाना अर्थात बोट अॅम्ब्युलंन्सचा प्रवास. तरंगत्या दवाख्यान्यातील तैणात आरोग्य पथक, आशा, अंगणवाडी सेविका हे मग नर्मदा किनाऱ्यांवर वस्ती असलेल्या वाड्या पाड्यावर लसीकरणासाठी अनेक किलोमीटरचा बोटीने प्रवास करुन गाठता तो नर्मदा किनारा. मग किनाऱ्यापासुन डोंगरावर दुरवर वसलेल्या गावापर्यत पायपीट करुन मग सुरु होते ती हर घर दस्तक लसीकरण अभियान.
गैरसमजातून विरोधही
या मोहीमेत काही पाड्यांवर एकाच ठिकाणी बसुन त्या ठिकाणच्या लाभार्थ्याना एकत्र आणुन लसीकरण केले जाते. तर कुठे घराघरापर्यत पोहचुन प्रत्येक लाभार्थ्यांला लस दिली जात आहे. दुसरीकडे आदिवासी बांधवामध्ये लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजातुन या लसीकरण पथकाला मोठा विरोधही सहन करावा लागत आहे. मात्र स्थानिकांच्या मदतीने हे काम शक्य होत असल्याच पथकातील वैद्यकीय अधिकारी सांगतात
आदिवासी बांधवांना बोटीतून आणत लसीकरण
साऱ्या मोहीमेत अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांची भुमिका तर मोलाची. अशाच एका पाड्यावर आम्हाला स्वतः डुगी (छोटी बोट) चालवत लाभार्थ्यांना तरंगत्या दवाखान्यापर्यत लसीकरणासाठी घेवुन येणाऱ्या आशाताई संगीता वसावे दिसल्या. तरंगता दवाखाना एका ठिकाणी उभा राहील्यानंतर नजीकरच्या डोगर दऱ्यांवर राहणाऱ्या आदिवासी बांधवाना त्या दवाखान्यापर्यत पोहचण्यासाठी रस्ताच नसल्याने आपल्या गावातल्या डुगीतून त्यांनी लसीकरणासाठी आणण्याचे काम या आशाताई करत होत्या. कधी हवा जास्त असली तर डुगी पलटण्याची ही भिती. मात्र मनात आपल्या वाड्या पाड्याला शंभर टक्के लसीकरण करण्याची जिद्द असल्याने आपल्याला होत असलेली मेहनत आणि त्रास या जिद्दीपुढे काहीही नसल्याच संगिता वसावे आवर्जुन सांगतात.
विरोधानंतरही लस टोचली
चिमलखेडी सारख्या आदिवासी बहुल भागात सुरवातीच्या काळात लसीकरणासाठी मोठा विरोध देखील होता. लस घेतल्यानंतर काहीतरी होत अशी अफवा असल्याने लोक लसीकरणासाठी अनेकदा आलेच नाही. मग काही सामाजीक कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध असतांना देखील लस टोचली आणि ते सुखरुप असल्याचे निदर्शानास आल्यानंतर आता त्या वाड्या वस्तातील लोक देखील लसीकरणासाठी पुढे येत आहे. विशेष म्हणजे घरादारा पर्यत मोठी मेहनत घेत आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येत असल्याने युवकांमध्ये देखील लसीकरणासाठीचा उत्साह दिसुन येतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.