Nandurbar News : ६६ लाखांच्या बाईक ॲम्बुलन्स भंगार अवस्थेत; करार संपल्याने ऍम्ब्युलन्स धूळखात

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे अनेक ठिकाणी जाण्यासाठी मोठे रस्ते नाहीत. त्यामुळे रुग्णांना गर्भवती महिला गावातून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बांबूच्या झोळीचा उपयोग केला जात होता
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील रुग्णांसाठी बाईक ॲम्बुलन्स हि सुविधा सुरु करण्यात आली होती. मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व ऍम्ब्युलन्स धुळखात पडल्या आहेत. बाईक ॲम्बुलन्सवर असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी जिल्हा परिषदेने वेतनाची तरतूद केलेली नाही. तर दुसरीकडे याचा मेंटेनन्स या कारणांमुळे बाईक ॲम्बुलन्सचा उपयोग होत नसल्याने या आता भंगार अवस्थेत झाल्या आहेत.

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असल्यामुळे अनेक ठिकाणी जाण्यासाठी मोठे रस्ते नाहीत. त्यामुळे रुग्णांना गर्भवती महिला गावातून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बांबूच्या झोळीचा उपयोग केला जात होता. आदिवासी दुर्गम भागातील माता बालमृत्यू कुपोषण आणि उपलब्ध नसलेल्या (Health Department) आरोग्यसेवा या बाबींचा विचार करत दुर्गम भागात गतिमान आरोग्य सेवा मिळावी; म्हणून ३ वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यासाठी १२ बाईक अंबुलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. 

Nandurbar News
Sambhajinagar Crime : महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरांची बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा राग

मात्र प्रशासनाच्या वतीने या बाईक अंबुलन्सवरील कर्मचाऱ्यांना मानधनची तरतूद तसेच गाड्यांच्या मेंटेनेसची तरतूद न केल्याने या गाड्या धुळखात पडून आहेत. एकीकडे रुग्णांच्या समस्यांवर अनेक चर्चा होत असताना प्रशासनाचा हा भोंगळ कारभार दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यास अडसर ठरत असल्याचे चित्र आहे. तर अति दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सण २०२० ते २०२३ या कालावधीत 620 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना देखील आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com