Nandurbar Constituency : गोवाल पाडवी यांना आदिवासी बोलीभाषा बोलता येत नाही; महामंत्री विजय चौधरी यांचं टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे रिंगणात उतरलेत. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर विरोधकांकडून एकमेकांवर टिकेचे बाण सोडण्यास सुरुवात झाली आहे.
Saam TV
Nandurbar ConstituencySaam TV

सागर निकवाडे, नंदूरबार

Nandurbar Political News :

महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे अ‍ॅडवोकेट गोवाल पाडवी यांना आदिवासी बोलीभाषा बोलता येत नाही. त्यांच्या असली गावातील दहा लोकांची नावे विचारा ते देखील सांगता येणार नाही असा काँग्रेसने उमेदवार दिला आहे, अशा शब्दांत महामंत्री विजय चौधरी यांनी हल्लाबोल केलाय.

Saam TV
Nandurbar News : वातावरण बदलाचा फटका; कैरीची आवक कमी, आमचूर उत्पादनावर परिणाम

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीने काही जागांवरील आपले उमेदवार जाहिर केले आहेत. नंदूरबारमध्ये महायुतीकडू भाजपच्या हीना गावाीत यांना उमेदवारी जाहिर झालीये. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे रिंगणात उतरलेत. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर विरोधकांकडून एकमेकांवर टिकेचे बाण सोडण्यास सुरुवात झाली आहे.

भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी गोवाल पाडवी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळत नव्हता, अशी अवस्था जिल्ह्यात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नंदुरबार जिल्ह्यात आले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा बडा नेता पद्माकर वळवी भाजपात आले अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवापूर येथील अग्रवाल भवनात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारावर टीकास्त्र सोडलं.

Saam TV
Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com