Animals safety : बापरे! गायीला असह्य वेदना होऊ लागल्या; ऑपरेशन केल्यावर पोटातून निघाली घातक वस्तू

गाईच्या पोटातून तब्बल ४० किलो प्लॅस्टिक काढून गायीला जीवदान दिले आहे.
Animals safety
Animals safety Saam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या वाढत चालली आहे. मोकाट जनावरे गावात फिरत असताना चाऱ्यासोबत उघड्यावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या देखील खातात. प्लास्टिक खाल्याने अनेक जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. अशात एका गाईच्या पोटातून क्लपनेच्या पलिकडे प्लास्टिक बाहेर काढले आहे. (Latest Nandurbar News)

मिळालेल्या माहितीनुसार, गायीच्या पोटात गेलेल्या प्लास्टिकमुळे गाईला त्रास होत असल्याने तिने चारापाणी सोडले होते. गायीची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आसल्याने शहादा शहरातील अनमोल सोनार यांनी संकल्प ग्रुपच्या सदस्यांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर ग्रुपच्या सदस्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत गाईची तपासणी केली.

Animals safety
Animal First Look: रणवीरच्या 'त्या' पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले, रक्तानं माखलेला शर्ट अन्.... ; अॅनिमल'चा फर्स्ट लूक आऊट...

यावेळी गाईच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या असल्याचं समोर आलं त्यानंतर ऑपरेशन करून गाईच्या पोटातून तब्बल ४० किलो प्लॅस्टिक काढून गायीला जीवदान दिले आहे.

Animals safety
Valentine's Day ला गाईला मिठी मारा, Animal Welfare Board च्या निर्णयावर Ajit Pawar स्पष्टच बोलले!

सांगलीमध्ये पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील रिळे येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले आहेत. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अचानक गावात गवे मृत पावत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभागच्या लगत दोन नर आणि १ मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागास मिळाली तर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध केली असता परिसरात एकूण पाच गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले.

वाघ, हत्ती, गवा अशा कोणत्याही जंगली प्राण्याला मारणे किंवा हानी पोहचवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती प्रण्यांची हत्याकरून त्यांचे दात, कातडी मोठ्या रकमेची मागणी करत विकतात. माणूस आपल्या हव्यासापोटी सर्व नियम पायदळी तुडवत आहे.अशात सांगलीमध्ये घडलेली ही घटना देखील अशाच हेतून झाली असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर अस्वच्छता आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर अद्याप पूर्ण बंद न केल्याने अनेक मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com