नांदेड दगडफेक; 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल, परिस्थिती नियंत्रणात

नांदेड मध्ये काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर रात्री पासून शांतता आहे. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी नांदेड बंदचे आवाहन करत धरणे आंदोलन केले. मात्र, दुपारनंतर परिस्थिती चिघळली.
नांदेड दगडफेक; 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल, परिस्थिती नियंत्रणात
नांदेड दगडफेक; 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल, परिस्थिती नियंत्रणातसंतोष जोशी
Published On

नांदेड : नांदेड मध्ये काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर रात्री पासून शांतता आहे. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी नांदेड बंदचे आवाहन करत धरणे आंदोलन केले. मात्र, दुपारी दोन त्यानंतर जमाव रस्त्यावर उतरत उघड्या असलेल्या दुकांनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शिवाजी नगर भागातील मिठाई दुकानावर दगडफेक करत समोर असलेल्या इनोव्हा कारची तोडफोड केली.

हे देखील पहा :

या नंतर डॉक्टरलेन, बर्कीभागात चौक, देगलूर नाका, जुना मोंढा परिसरात दगडफेक करुन अनेक चार चाकी वाहनं फोडली तसेच दोन दुचाकी ही जाळण्यात आल्या. दरम्यान, दगडफेकीच्या या घटनेनंतर पोलीसांचा मोठा फौजफाटा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरला.

नांदेड दगडफेक; 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल, परिस्थिती नियंत्रणात
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची NCB SIT कडून साडे पाच तास चौकशी!
नांदेड दगडफेक; 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हे दाखल, परिस्थिती नियंत्रणात
अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चा दरम्यान दुकानांची तोडफोड! पहा Video

मात्र, जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने तीन पोलिस जखमी झाले. पोलिसांनी रात्रीपासून दगडफेक करणाऱ्या समजकंटकाची धरपकड सुरू केली आहे. तर रात्री उशिरा 60 ते 70 समाजकंटकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आणि पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगत शांततेचे आवाहन केलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com