After Ajit Pawar Rebel : 'आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या'; राजकीय घडामाेडींवर युवा वर्ग नाराज

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलणा-या घडामाेडींवर युवक नाराज.
nanded, youth
nanded, youth saam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded News : आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या असे म्हणत बोटाला चुना लावत नांदेड शहरात युवा वर्गाने अनोखे आंदोलन केले. या आंदाेलनाची चर्चा शहरात जाेरदार सुरु झाली. (Maharashtra News)

nanded, youth
Parbhani Crime News: पहिलीच्या प्रवेशासाठी लाच घेतली, एसीबीची लिपिकासह मुख्याध्यापकावर कारवाई

राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील मतदार राजा मात्र कमालीचा वैतागला आहे. नांदेड (nanded) येथे मतदान असलेल्या युवकांनी अनोखं आंदोलन केले. सन 2019 नंतर झालेल्या निवडणुकीत आम्ही मतदान केले होते. परंतु आमच्या मताची थट्टा मांडलीय अशी भावना युवकांनी व्यक्त केली.

nanded, youth
How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

युवक म्हणाले राज्यात सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (After Ajit Pawar Rebel) बदलले जात आहेत. हा महाराष्ट्राच्या जनतेच्या जनमताचा अपमान आहे. लोकशाहीचा खून करणारा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.

दरम्यान आम्हांला दिलेला मतदानाचा अधिकार परत घ्या अशी मागणी युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी युवकांनी (youth) बोटाला चुना लावत राजकारण्यांचा निषेध नाेंदविला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com